नाहाटा महाविद्यालयात कायदेविषयक शिबिरात पोकसो कायदा जनजागृती कार्यक्रम संपन्न

भुसावळ ( २९ जुलै ०प्रतिनिधी ) – नाहाटा महाविद्यालयात युवती कल्याण समिती, महिला तक्रार निवारण व विशाखा समिती, विद्यार्थी परिषद समिती आणि तालुका विधी सेवा समिती, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिराचे (POCSO ) पोक्सो कायदा जनजागृती आयोजन करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्रचार्य प्रा. डॉ. डि. एन. पाटील , प्रमुख वक्ते ॲड. जास्वंदी भंडारी, युवती कल्याण समिती प्रमुख प्रा. डॉ. गौरी पाटील, महिला तक्रार निवारण व विशाखा समिती प्रमुख प्रा. डॉ. विद्या पाटील, विद्यार्थी परिषद समिती प्रमुख प्रा. डॉ. एम. जे जाधव, समांतर विधी सहाय्यक सदस्य सौ. स्वाती भोळे आणि सौ. रुपाली नेवे उपस्थित होते. उदघाट्न सोहळ्याचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांनी भूषवले. कायदेविषयक शिबिराच्या उदघाट्न प्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. गौरी पाटील यांनी केले.

ॲड. जास्वंदी भंडारी यांनी पोक्सो कायदा म्हणजेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ हा बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा घटनातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी भारत सरकारने २०१२ साली तयार केलेला कायदा आहे, निर्भया हत्याकांडानंतर कशी पोकसो कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता भासली असे सांगितले. विद्यार्थ्यांना माहिती देताना वेगवेगळी उदाहरणे देऊन शैक्षणिक करियर तसेच संपूर्ण आयुष्य विविध कारणांनी कसे उद्धवस्त होऊ शकते हे पटवून दिले. प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांनी अध्यक्षीय भाषणात विदयार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून उत्तम नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अक्षरा साबळे व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. विद्या पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन साठी समिती सदस्य प्रा. डॉ. स्मिता चौधरी, प्रा. डॉ. ममता पाटील, प्रा. डॉ. रश्मी शर्मा, प्रा. प्रा. डॉ. स्वाती फालक, डॉ. निलीमा पाटील, प्रा. स्मिता बेंडाळे, प्रा. हर्षल पाटील, प्रा. डॉ. संगीता भिरुड, प्रा. पूनम महाजन, प्रा. अर्चना भालेराव यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन. एस. एस. विद्यार्थी, संगणक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.