डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त छात्रभारती मुंबईच्या वतीने १२९ गोरगरिब मजुरांना किराणा साहित्याचे वाटप :

मुंबई –
देशभर डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.सध्या करोना विषाणुमुळे जगभरात आलेल्या महामारीमुळे जयंती महोत्सव घरातच साजरा केला जातोय. असे असले तरी गोरगरिब मजुरांना मदतीचा हात देत डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त मुंबई व उपनगरातील १२९ कुटुंबांना महिन्याभराचे किराणा साहित्य देऊन जयंती साजरी केल्याचे छात्रभारती मुंबईचे अध्यक्ष रोहित ढाले यांनी सांगितले..
साकीनाका,कुर्ला,कांजुरमार्ग,चेंबुर,परेल,लालबाग,पनवेल येथील १२९ गरजु कुटुंबांपर्यत साहित्य पोहोचवण्याचे कार्य छात्रभारतीचे जितेश किर्दकुडे , निलेश झेंडे,विकास पटेकर, आदित्य हिरे, राहुल सामल यांनी केले अशी माहिती रोहित ढालेंनी दिली.
जागतिक महामारीच्या काळात संविधानाच्या चौकटीत राहुन आज सर्वत्र आंबेडकर अनुयायांनी शिस्तीने घरीच राहुन लाॕकडाऊनचे पालन केले. विहारं सजवलेली असली तरी कुलुप लावुन बंद केलेली दिसलीत. छात्रभारतीसह जयंतीचे औचित्य साधत भुकलेल्या भावंडांना मायेने घास भरवण्याचे कार्य अनेक संस्था संघटना करताना मुंबईच्या रस्त्यावर दिसल्या असे छात्रभारतीचे रोहित ढाले यांनी सांगीतले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *