दिव्यांग व्यक्तींना वेळच्या वेळी जीवनावश्यक वस्तूंचे मदतकार्य होत असल्याबद्दल दिव्यांगांकडून प्रशंसा

मुंबई (प्रतिनिधी )-
 देशव्यापी लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची जीवनावश्यक गोष्टींबाबत कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याकरिता महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सुरूवाती पासूनच सतर्क रहात नियोजबध्द पावले उचलली असून अन्नधान्य, किराणा माल, दूध, भाजीपाला, फळे, औषधे पुरवठादारांच्या असोसिएशच्या पदाधिका-यांशी बैठका घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत त्या दूर केल्या आहेत. यामध्ये एपीएमसी तसेच पोलीस प्रशासनाचेही महत्वाचे सहकार्य लाभले आहे.
 सर्व नागरिकांच्या सुविधांचा विचार करीत असतानाच आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग व्यक्तींकडे अत्यंत सहृदयपणे लक्ष दिले जात असून दिव्यांग व्यक्ती आणि काळजी घेण्यास कोणी नसलेले ज्येष्ठ नागरिक यांच्याकरिता विशेष मदतकार्य कक्ष तयार करण्यात आला आहे.या कक्षामार्फत दिव्यांग व्यक्तींना 3 किलो तांदूळ, 5 किलो चक्की फ्रेश गव्हाचे पीठ, 1 किलो तूरडाळ, 1 किलो साखर, 1 किलो मीठ व 1 किलो तेल अशा जीवनावश्यक साहित्यांचे किट्स वितरित करण्यात येत आहेत. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक गोष्टींची आवश्यकता असणा-या 188 दिव्यांग व्यक्तींना हे किट्स वितरित करण्यात आलेले आहेत.दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधांमध्ये अग्रणी असणारी नवी मुंबई महानगरपालिका अशा अडचणीच्या काळातही हक्काचा आधार होत असल्याबद्दल दिव्यांग कृती समिती नवी मुंबईचे अध्यक्ष शंकर पडुळकर यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना धन्यवाद दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *