मुंबई (प्रतिनिधी )-
कोरोना विषाणू साथीमुळे मागील १९ दिवसांपासून संपूर्ण देशात लॉक डाऊन चालू आहे. हातावर पोट असणाऱ्या मजूर गोरगरीब जनतेचे खुप हाल होत आहेत. त्यांना थोडाफार मदतीचा हात द्यावा या उद्देशाने लोकनेते गणेश नाईक यांच्या माध्यमातून संपूर्ण नवी मुंबई शहरात ६०० टन धान्य आणि १ लाख ७० हजार मास्कचे वाटप करण्यात येत आहेत.
नवी मुंबई प्रभाग नंबर १०० मध्ये रविंद्र इथापे व सुरेखा रविंद्र इथापे यांनी आपल्या प्रभागातील भिमाशंकर सोसायटीमधील रहिवाशांना, सर्व सोसायट्यांचे वाॅचमन, सफाई कामगार, रोजंदारी कामगार यांना ३ टन तांदुळ, ५ क्विंटल तूरडाळ या धान्याचे जवळजवळ ६०० कुटुंबियांना वाटप करण्यात आले.या वेळी एफ आणि व्हीचे मालक बाळासाहेब बडदे यांच्यावतीने भाजीवाटप व कामगारांना सभागृह नेते रविंद्र इथापे यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. या उपक्रमासाठी भिमाशंकरचे अध्यक्ष रमेश पवार, भाजपा वाॅर्ड अध्यक्ष रवि डेरे, संचालक रंगराव पाटील, केशवकाका नलावडे, रवि पुजारी, रविंद्र हांडे, संतोष फापाळे, राहुल इथापे, धनंजय पाचपुते, डी जी पाटील, बाळासाहेब खिलारी यांनी अतिशय मेहनत घेतली.



