नवी मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमी आपल्या जीवाची पर्वा न करता नवी मुंबई कार्यक्षेत्रात सुविधा देणाऱ्या व समस्या सोडविणाऱ्या पालिका प्रशासनातिल आस्थापनेवरील कर्मचारी व अधिकारी यांचे अर्धे पगार कपात करू अशी मागणी युनियनचे विजू पाटील यांनी केली आहे.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यात प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य विभाग रूग्णालयात तर पोलिस रस्त्यावर कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पालिका प्रशंसनीय काम करत आहे. सध्या रेल्वे बंद आहेत. बससेवा विलंबाने सुरू आहेत. कर्मचारी व अधिकारी रिक्षाने ये-जा करावी लागत आहे. वास्तविक ही सुविधा प्रशासनाने पुरविणे आवश्यक असताना कर्मचारी व अधिकारी पदरमोड करण्याची वेळ आली आहे.
अश्याहि परिस्थिती जीव धोक्यात घालून नागरी सुविधा देण्याचे व नागरी समस्या सोडविण्याचे काम करत आहेत. ते आपल्या घरादाराचा व मुलाबाळांचा विचारही न करता आपणास सेवा देत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने कोरोनाच्या काळात प्रशासकीय सेवा देणाऱ्या ठोक मानधनावरील तसेच कंत्राटी आणि महापालिका आस्थापनेवरील कामगारासह कर्मचारी व अधिकारी यांचे अर्धे पगार कपात केल्यास घर भाडे, कर्जाचे हाप्ते, मुलांच्या शाळेची फी, पाणी व लाईट बिल कसं भरणार असा प्रश्न पडला आहे. दैनंदिन भत्ता देणे आवश्यक आहे. नवी मुंबई महापालिकेनेही लवकरात लवकर यावर निर्णय घेण्याची मागणी अधिकारी, कर्मचारी व कामगार युनियनचे अध्यक्ष विजू पाटील यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे



