पक्षांना उन्हाळ्यात पाणी मिळावे म्हणून ताप्ती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केली व्यवस्था.

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील ताप्ती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा आगळावेगळा उपक्रम. सध्या कडक उन्हामुळे नदी,तलाव या ठिकाणापासून दूरवर पाणी मिळत नसल्याने पक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. जंगल परिसरात गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने पर्यावरण संतुलन बिघडले. त्यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे नैसर्गिक पाण्याची सोत कमी झाली. परिणामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी पशु पक्षांना भटकंती करावी लागते.परिणामी ते मानवी वस्तीत शिरतात मानव व पक्षी यांच्यातील जिवभाव परिसराला नवीन नाही.
त्यामुळे उन्हाळ्याच्या उकाळ्यापासून बचाव व्हावा व पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी शहरात व शाळे परिसरात पक्ष्यांना पाणी मिळावे म्हणून पाण्याचे डोंगे व प्लास्टिकच्या प्लेटमध्ये तसेच मातीच्या प्लेटमध्ये पाणी टाकून गच्चीवर ठेऊन व काही ठिकाणी झाडावर लटकवले असून त्यासोबत अन्नाचीही व्यवस्था केली आहे. या उपक्रमात शाळेच्या प्रिन्सिपल नीना कटलर सह विद्यार्थी व शिक्षक वर्ग सहभागी होते.
उन्हाळ्यात पक्षांना पाणी न मिळाल्यामुळे ते मरण पावतात उन्हाळ्यात पक्षांना पाणी मिळावे म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

शहरात व शाळा परिसरात झाडावर व गच्चीवर पक्ष्यांना उन्हाळ्यात पाणी मिळावे म्हणून आमच्या विद्यार्थ्यांनी २५० ते ३०० ठिकाणी डोंगे लावले आहे.तसेच सुट्ट्यांमध्येही या डोंग्यात पाणी टाकले जाणार आहे. एप्रिल व मे महिन्यापर्यंत उन्हाळा कमी होस्तर पक्ष्यांना रोज पाणी टाकले जाणार असल्याचे ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल निना कटलर यांनी ही माहिती दिली.

फोटो कॅप्शन – ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये पक्षांना उन्हाळ्यात पाणी मिळावे म्हणून पाण्याचे डोंगे लावली. त्याप्रसंगी उपस्थित प्रिन्सिपल निना कटलर व विद्यार्थी.