कोणतीही अट न ठेवता सर्वांना सरसकट रेशन धान्य वाटप करा – दीपक धांडे यांची मागणी;

भुसावळ( प्रतिनिधी) –
कोणतीही अट न ठेवता सर्वांना सरसकट रेशन चे धान्य वाटप करा अशी मागणी दीपक धांडे यांनी नायब तहसीलदार यांच्या कडे मंगळवार ७ एप्रिल रोजी निवेदनाद्वारे केली.
सध्या संपूर्ण देशा मध्ये कोरोना व्हायरस मुळे लॉक डाऊन करण्यात आले आहे त्यामुळे सर्व शेतकरी , व्यवसायिक ,कष्टकरी,बांधकाम कारागीर हातमजुरी करणारे आदीं सर्वच नागरिक गेल्या २२ तारखेपासून घरीच बसून आहे. त्या मुळे कमवणारे वक्तीच घरी असल्याने सर्व कुटुंबा वर उपासमारीची वेळ आली आहे आणि रेशन दुकनदार फक्त प्राधान्य लाभार्थी म्हणजे ज्यांचे अन्न सुरक्षा यादीत नाव आहे असे व अंत्योदय लाभार्थी जांच्या जवळ पिवळे रेशन कार्ड आहे याणांच धान्य देत आहे ( ते पण कमी प्रमाणात नियमानुसार नाही) परंतु शासनाच्या वतीने लॉक डाऊन हे सर्व नागरिकांसाठी केलेले आहे. त्यामुळे ज्यांच्या जवळ केशरी रेशन कार्ड आहे परंतु त्यांचे नाव अन्न सुरक्षा यादीत नाही अशा कुटुंबावर हा अन्यायच आहे . तसेच बऱ्याच नागरिकांनजवळ केशरी रेशन कार्ड सुध्दा नाही आणि असे लोक सुध्दा शासनाच्या आदेशाचे पालन करीत आहे म्हणून एक प्रकारे अशा नागरिकांवर हा अन्यायच आहे म्हणून शासनाने प्राधान्य लाभार्थी व अंत्योदय लाभार्थी असे कुठलेच निकष न ठेवता सर्वांना सरसकट ३ महिने पुरेल असे धान्य त्यात गहू तांदूळ ज्वारी तूरडाळ तेल कांदे बटाटे प्रत्येकाच्या घरी येऊन द्यावे जेणेकरून रेशन दुकानात गर्दी होणार नाही व रेशन घेण्याचा का कोरॉना चा व्हायरस शहरात पसरणार सुध्दा नाही त्या मुळे शासनाचा लॉक डाऊन चा उद्देश सुध्दा सफल होईल व रेशन घेण्याच्या कारणाने लोक बाहेर सुध्दा येणार नाही
शासनाने ह्या निवेदनाचा गांभीर्यपूर्वक विचार करून सर्व नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोहोच द्याव्यात असे आवाहन दीपक धांडे यांनी केले आहे .सदर निवेदन प्रत मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री , ना छगन भुजबळ ,अन्न व नागरी पुरवठामंत्री, ना गुलाबराव पाटील पालकमंत्री जळगाव जिल्हा,खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे ,भुसावळ प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांना रवाना करण्यात आल्या आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *