भुसावळातील लोकांमध्ये अजूनही जागृकतेबाबत उदासीनता ; सोशल डिस्टनसिंगसह कायदा व सुव्यवस्थतेचा भाजीबाजारात फज्ज़ा

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रशासन अत्यंत चोख व काटेकोर भूमिका बजावत आहे . आरोग्यखाते व पोलीस प्रशासन जिवाचे रान करीत आहे . मात्र अजूनही काही नागरिकांची मानसिकता बदलत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे . कोरोना मुळे देशात राज्यात लोकडाऊन आहे.मात्र जीवनावश्यक वस्तु किराणा,अन्न धान्य, औषध व भाजीपाला ,दूध सेवा सुरु आहे . मात्र भुसावळ शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानवर विक्रेते व ग्राहकांच्या बेशिस्त वागणुकीमुळे सोशल डिस्टनसिंगचा चांगलाच फज्ज़ा उडाल्याचे दिसून य्यत आहे .
भुसावळ शहरात नगरपरिषदेतर्फे भाजीबाजारात होणारी गर्दी टाळण्याकरिता चार ते सहा ठिकाणी भाजीपाला विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्याप्रमाणे विक्री सुरु केली आहे. तरीसुद्धा मंगळवार ७ रोजी सकाळी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावरील बाजारात विक्रेते व ग्राहकांच्या बेशिस्त वागणुकीचे चित्र दिसून आले आहे . भाजीपाला विकणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांनी तसेच ग्राहकांनी मास्क न लावता तसेच सोशल डिस्टनसिंग चा नियम न पाळता दूकानांवर एकच गर्दी केल्याचे दिसुन आले आहे .प्रशासन सर्व नियम पाळत आहे मात्र लोकांमध्ये अजूनही या भयानक परिस्थिती बद्दल गांभीर्य असल्याचे दिसत नाही . याकरीता पालिका प्रशासनाने अजूनही अधिक जनजागृती करावयाची आवश्यकता आहे .
दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था पाळावी, सोशल डिस्टन पाळावे, सर्वाना जीवनावश्यक वस्तु व सेवा मिळणार आहे ,गोंधळ घालु नये, घराबाहेर पडू नका,सर्वत्र निरजंतुकीकरण करण्याकरीता फवारणी करण्यात येत आहे , पालिका प्रशासन सर्वतोपरी सज्ज असून योग्य ती खबरदारी घेत आहे , घाबरु नका ,काळजी घ्या घरात रहा , सुरक्षित रहा असे आवाहन मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी नागरीकांना केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *