भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील राजेंद्र बावस्कर निर्मित आणि प्रकाश नारायण जाधव व राजेश अंबादास पवार दिग्दर्शित “साडेतीन एकर “ही शेतकऱ्यांच्या जीवनावरील लघुचित्रपट अत्यंत दर्जेदार असून यालघूपटाचे लेखन अप्रतिम आणि अंतर्मनास भिडणारे आहे

यात शेतकऱ्यांची विदारक वास्तवता रेखाटली आहे शेतकऱ्याला फक्त शेतीच्या उत्पन्नावरच अवलंबून राहावे लागते व व त्या उत्पन्नावर मुलांचे शिक्षण संसाराचा खर्च यावरच भागवत असतो त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती खूपच कमकुवत असते म्हणून प्रत्यक्ष शेतकऱ्याला त्याच्यासोबत जोडधंदा करणं हे जरुरीचे झाले आहे प्रत्येक शेतकऱ्याने गाय म्हैस बकरी कोंबड्या सांभाळावे हे सर्व उत्पन्नाचा स्रोत आहे जसे गाई म्हशी पासून दूध मिळते घरीच बैल जोडी तयार होतात व प्रत्येक शेतीचे काम हे शेतकऱ्याने आपल्याच बैल जोडीने करायला पाहिजे त्यामुळे त्याचे पैसे वाचतील तसेच गाय म्हैस यापासून मिळणारे खत शेतात टाकून चांगले पीक मिळू शकते पण आजच्या काळात सर्वकाही ट्रॅक्टरने करणे व दिवसेंदिवस आळशी होत चालल्यामुळे त्यांच्या अंगातून काम निघून गेले आहेत फिल्मची कन्सेप्ट आयडिया खेडेगावातील कलाकार दिग्दर्शक व संगीत खूप छान झाले आहे
या लघुपटाचे लिखाण राजेंद्र बावस्कर यांनी केले असून सर्व कलाकारांनी सुंदर अभिनय केलेला असून हा लघू पट सर्वानी बघण्यासारखी आहे वरिष्ठ शेती ,मध्यम व्यापार , कनिष्ठ नोकरी ही संकल्पना शेतकऱ्यांमध्ये निर्माण करून शेतकरी बचत गट बनवायला सांगितले व आपण सारे एक होऊ सतत पुढे चालत राहू असा संदेश या फिल्म द्वारे देण्यात आला आहे



