भुसावळ (प्रतिनिधी ) –
एकी अहिल्यादेवी कन्या विद्यालय भुसावळ विद्यालयात आज यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व अहिल्यादेवी कन्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक नाना पाटील सर यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या विषयी विचार व्यक्त करताना यशवंतराव चव्हाण हे सामान्य शेतकरी कुटुंबातून येऊन अतिशय स्वतःच्या मेहनतीने कष्टाने आपली ओळख निर्माण करून देशाच्या उपपंतप्रधानपदी व त्याचप्रमाणे स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले त्यांच्या कार्यामुळे त्यांना जनतेने महाराष्ट्राचा शिल्पकार म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव केला . त्यांचे भारताच्या विकासात महत्वाचे योगदान होते .एक अभ्यासू दूरदृष्टी असलेले आणि प्रगल्भ राजकारणी यशवंतराव चव्हाण होते .
यशवंतराव चव्हाण यांना लहानपणीच आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले त्यांची आई वानू ताई चव्हाण यांनी मोठा कष्टाने त्यांना वाढवले आणि शिक्षणासाठी प्रेरित केले शिक्षण घेत असताना त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला परंतु जिद्दीच्या जोरावर ते पुढे गेले .व आपल्या देशाचा विकास केला असे प्रतिपादन त्यांनी केले यावेळी सर्वप्रथम यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला नाना पाटील व पी पी जोशी सर यांच्या हस्ते मार्ल्यापण करण्यात आले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कोमल जोशी यांनी केले



