महासंघ चपक : शरीर स्वास्थ्यासाठी खेळा – मान्यवरांचा सूर :

भुसावळ : शरीर स्वास्थासाठी खेळणे आवश्यक आहे. खेळांमुळे खिलाडूवृत्ती निर्माण होते. यासाठी खेळाला वेळ देणे आवश्यक आहे, असा सूर मान्यवरांनी व्यक्त केला.

शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघातर्फे आयोजित शिक्षकांच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांचे जल्लोषात उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य अनिल झोपे, शैलेश पाटील, विजय पवार, प्रमोद नेमाडे, किरण महाजन, अनिल गायकवाड, सुजित भोळे, अशोक मदाने, टी. के. पाटील, आशिष पवार, अजित चौधरी, जीवन महाजन आदी उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी महासंघाचे भुसावळ तालुकाध्यक्ष गणेश लोखंडे, सचिव विष्णू इतवारे, उपाध्यक्ष नरेश मु-हेकर, प्रसन्ना बोरोले, देव सरकटे अतुल सोनुने आनंद पाटील आदी परिश्रम घेत आहेत.

११ संघांचा सहभाग

जिल्ह्यातील भुसावळ, रावेर, यावल, जळगाव, अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा, पारोळा, भुसावळ येथील सहभाग घेतला होता.

विजेत्या संघांमधील सामनावीर विजेत्या संघांमध्ये आजचे सामनावीर म्हणून देव सरकटे (भुसावळ), प्रफुल्ल सरोदे जळगाव, रामकृष्ण इतवारे भुसावळ, अनिकेत पाटील जळगाव, अंकित पाटील अमळनेर चंद्रशेखर पाटील चोपडा, सागर भावसार अमळनेर या खेळाडूंना सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

फोटो ओळ – शिक्षकांच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या उदघानप्रसंगी अनिल झोपे, शैलेश पाटील, विजय पवार आदी.