भुसावळला १९ रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ;

भुसावळ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि विचार बालमनावर रुजावेत या हेतूने अंतर्नाद प्रतिष्ठान भुसावळ यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय महावक्तृत्व स्पर्धेचे आयोजन १९ फेब्रुवारी रोजी ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये करण्यात आले आहे. यंदा स्पर्धेचे ८ वे वर्ष आहे. वक्तृत्व स्पर्धा ५ गटात होणार आहे. प्रत्येक गटातील ३ विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येईल. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेसाठी नाव नोंदणीची फेब्रुवारीपर्यंत करावी बक्षीस वितरण २६ रोजी नाहाटा महाविद्यालय होईल.

गट क्रमांक १ साठी छत्रपती शिवाजी महाराज, गट क्रमांक २ अ साठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे शूर मावळे, ब) छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण , क) छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुणवैशिष्ट्ये, गट क्रमांक ३ अ साठी युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, ब) छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले, क) शिवराज्याभिषेक सोहळा, गट क्रमांक ४ अ साठी शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ, ब) आज छत्रपती शिवराय असते तर, क) आधुनिक काळात छत्रपती शिवरायांच्या विचारांची गरज, गट क्रमांक ५ (खुला गट) अ) छत्रपती शिवाजी महाराजांची राजनिती, ब) राजमाता जिजाऊंचे बाळकडू – आधुनिक काळाची गरज, क) मी छत्रपती शिवाजी राजे भोसले बोलतोय.