भुसावळ – द.शि.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भुसावळ येथे पी एम योजनेअंतर्गत व हुतात्मा दिनाबद्दल ‘व्यसनमुक्ती’ या विषयावर व्याख्यान तसेच व्यसनाचे परिणाम दर्शवणारे चित्र प्रदर्शन व छाया प्रदर्शन इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राजेंद्र फातले मुख्याधिकारी भुसावळ नगरपरिषद यांनी भूषवले प्रमुख पाहुणे आणि वक्ते मा. डॉ. प्रा. दयाधन राणे हे होते.

ब प्रमुख अतिथी चंद्रकांत चौधरी नशा मुक्ती राज्य संघटनेचे सरचिटणीस हे होते. या प्रसंगी डॉ. प्रा. दयानंद राणे यांनी व्यसन कोणत्याही प्रकारचे असले तरी त्याचे दुष्परिणाम अत्यंत वाईट असतात हे विद्यार्थ्यांना अनेक उदाहरण आणि दाखले सह स्पष्ट केले . चंद्रकांत चौधरी यांनी विद्यार्थी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी व्यसनमुक्तीची शपथ घेण्याचे आवाहन केले अध्यक्ष स्थानी बोलताना मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या आयुष्यासाठी आणि चांगल्या करिअरसाठी व्यसनमुक्त असणे आवश्यक आहे हे विद्यार्थ्यांशी संवाद साधत पटवून दिले…
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सचिव . संजय मंदवाडे सर ज्येष्ठ शिक्षक वसंत सुलताने सर, उत्सव समिती प्रमुख एम एम चौधरी सर आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनीता मोरे देखील या ठिकाणी उपस्थित होत्या सूत्रसंचलन आणि आभार श्रीमती सीमा बोरोले यांनी मानले..


