यावल तालुक्यातील पैझरी डोंगरदे येथे महिलांसाठी व बालसंस्कार केंद्रातील मुलांसाठी कार्यक्रम संपन्न :

भुसावळ – यावल तालुक्यातील पैझरी व डोंगरदे या अतिदुर्गम भागात बालसंस्कार केंद्रातील मुलांसाठी शैक्षणिक साहित्य तसेच महिलांना हळदीकुंकू व वाण देवगिरी कल्याण आश्रम जिल्ह्यातर्फे देण्यात आले .

प्रसंगी पैझरी तालुका यावल येथे बाल संस्कार केद्रातील मुलांशी गप्पा करत त्यांना शिक्षणाचे व स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले व त्यांना खाऊ वाटप करण्यात आले व आधारकार्ड, रेशनकार्ड व महिलांना बचत गट समुह करण्याविषयी माहिती दिली

यावेळी देवगिरी कल्याण आश्रमच्या जिल्हा महिला सहप्रमुख ऍड जास्वंदी भंडारी , जिल्हा सहकोषाध्यक्ष ऍड जयश्री देशमुख , यांचेसह सुनंदा खरे यांनी बालसंस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता फळा (ब्लॅक बोर्ड ) भेट दिला . यावेळी संघटनमंत्री विरसिंग वसावे व इतर सहकारी उपस्थित होते