देवगिरी कल्याण आश्रमच्या वतीने भिल्ल वस्तीत महिलांसाठी हळदीकुंकू ;

भुसावळ – देवगिरी कल्याण आश्रमच्या वतीने तालुका समितीच्या वतीने सातारे भागात जळगाव रोड मरीमाता मंदीर जवळील भिल्ल वस्तीत महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला .

यावेळी नारीशक्ती दिवस म्हणून राणी मॉ गाईदिनल्यु यांचे प्रतिमा पुजन केले व महिलांना हळदीकुंकू व वाण म्हणून साडी , ब्लाऊज पीस, हेअर ऑइल पाऊच दिले. यावेळी ऍड. मंजुषा कुलकर्णी यांनी राणी मॉ गाईदिनल्यु यांचे विषयी तर जास्वंदी भंडारी यांनी देवगिरी कल्याण आश्रम व भगवान बिरसामुंडा यांची माहिती दिली. यावेळी ॲड चित्रा आचार्य, ॲड जयश्री देशमुख, उज्वला बागुल, ॲड रेखा सपकाळे, विजया निकम, रिना गायकवाड, प्रतिमा अग्रवाल या समिति सदस्य उपस्थित होत्या