भुसावळ – येथील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष मनोज बियाणी,संस्थेच्या सचिव डॉ संगीता बियाणी,राजीव पारिख,प्रवीण भराडिया यांच्या हस्ते ११ रोजी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. भुसावळ वाहतूक नियंत्रण शाखेचे संजय भदाणे, रवींद्र साळुंखे,बाजारपेठ पोलीस स्टेशनचे तेजस पारेसकर, भाऊसाहेब पाटील,तालुका पोलीस स्टेशनचे पारधी,सोनवणे यांनी बंदोबस्त व वाहतूक सुरक्षेसाठी सहकार्य केले.
या मॅरेथॉन स्पर्धे मध्ये इ.पहिली व दुसरी प्रथम गट, तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्याचा द्वितीय गट,इ.पाचवी ते सहावी तृतीय गट, इ.सातवी व आठवी विद्यार्थ्याचा चतुर्थ गट व नववी ते बारावी विद्यार्थ्यांचा पाचवा गट तसेच वयोगटा प्रमाणे मुलींचे विविध गट तयार करण्यात आले होते. शाळेच्या एकूण ११०० विद्यार्थी व विद्यार्थिनींनी स्पर्धेत सहभाग घेतला.
विजयी स्पर्धक याप्रमाणे – (लहान गट) प्रथम गट
मुली : प्रथम माहेरा तडवी,द्वितीय निशा बारेला,तृतीय योगेश्री पावरा.
प्रथम गट मुले: दुर्गेश दागोडे,द्वितीय अजय शांताराम कोल्हे,तृतीय देवेश भरत कोल्हे.
दुसरा गट मुली : प्रथम हेमांगी धनगर,द्वितीय रिया वसावे, तृतीय वैष्णवी जमादार.मुलांमध्ये प्रथम ओम बोरसे,द्वितीय वैष्णव परदेशी,तृतीय अंश धनगर.
तिसरा गट (मोठा गट) मुली : प्रथम वैष्णवी कोळी,द्वितीय ज्ञानेश्वरी पाटील,तृतीय दिव्यानी पाटील.
तिसरा गट मुले : प्रथम अंश मोरे,द्वितीय प्रथमेश परदेशी, तृतीय पियुष भारसाकडे.
चौथा गट मुली : प्रथम :शताक्षी बिसेन,द्वितीय अनुष्का जयस्वाल,तृतीय संतोषी पाडवे.चौथा गट मुले : प्रथम क्रमांक योगेश परदेशी,द्वितीय : चिराग फेगडे,:तृतीय भारत हाके.
पाचवा गट: मुली प्रथम तेजस्विनी पावरा, द्वितीय दिव्या बारेला,तृतीय सानिया तडवी.पाचवा गट मुले प्रथम रितेश बारेला,द्वितीय कुलदीप पावरा.तृतीय :मयूर पाटील.
सदर स्पर्धेत प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या धावपटुचा मान्यवरांच्या हस्ते पदक व बक्षिसे देवून गौरव करण्यात आले. यात मोठा गट हा आठ किलोमीटर पर्यंत धावला तर छोटा गट पाच किलो मीटर पर्यंत धावला.
सदर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य डी एम पाटील,तौसिफ कुरेशी,तुषार सैतवाल,सुधिर पाटील,स्वराली कुबेडकर,समाधान सुर्यवंशी,दिपाली मेश्राम तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

फोटो कॅप्शन – भुसावळ येथे बियाणी मिलिटरी स्कुल मध्ये मॅरॉथॉन स्पर्धेत धावतांना विद्यार्थी.


