भुसावळ – आज पहाटे ६.३० वाजेचे सुमारास जामनोहल्ला भागात हॉटेल शालिमार परिसरातील डी डी टी सेंटर जवळ एका तरुणावर गोळी झाडल्याची घटना येथे घडली .घटनेचे वृत्त समजताच घटनास्थळी डीवायएसपी कृष्णांत पिंगळे यांचेसह बाजारपेठ पोलीस दाखल झाले असून जखमी तरुणास उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे . अधिक तपास पोलीस करीत असून जुन्या वादातून सदर गोळीबार झाल्याची चर्चा आहे . या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे . अधिक वृत्त लवकरच …




