महाव्यवस्थापकांनी केली पुणे विभागातील मनमाड-दौंड सेक्शनची संरक्षा तपासणी ;

  • रेल्वेचे महाव्यवस्थापक धरम वीर मीना यांनी ३ जानेवारी २०२५ रोजी पुणे विभागातील मनमाड – दौंड विभागाची सविस्तर संरक्षा तपासणी केली.

येवला-कोपरगाव विभागातील हायस्पीड रनने तपासणीला सुरुवात झाली. पुढे महाव्यवस्थापकांनी 456/427 ते 455/707 किमी अंतरावर अप दिशेकडील कर्व क्र. 141 आणि कोपरगाव-कान्हेगाव विभागातील लिमिटेड हाइट सबवे तपासल्यानंतर कान्हेगाव आणि पुणतांबा स्थानकांदरम्यान 439/3-7 किमी अंतरावर गोदावरी पूल क्रमांक 439/1 ची तपशीलवार तपासणी केली.

शिर्डीकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी महत्त्वाचे जंक्शन असलेल्या पुणतांबा स्थानकावर महाव्यवस्थापकांनी लॉबी, रनिंग रूम, एएसएम पॅनेल रूम, रिले रूम आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग इंस्टॉलेशनची पाहणी केली. डिस्प्लेवरील इनोव्हेशन्सचा भाग म्हणून त्यांनी स्मॉल ट्रॅक मशीन्स आणि अल्ट्रासोनिक फ्लॉ डिटेक्शन मशीन्सचीही पाहणी केली. आरपीएफ श्वान पथक चेतक आणि वर्धन यांच्या अंमली पदार्थ शोधण्याच्या क्षमतेचे प्रदर्शन करण्यात आले ज्याचा यशस्वीरित्या वापर केला जात आहे.

श्री मीना यांनी ओव्हर हेड इक्विपमेंट गँग आणि संपूर्ण सुसज्ज गँग हटचीही पाहणी केली.

पुढे महाव्यवस्थापकांनी पुणतांबा – चितळी सेक्शनमधील 430/33-31 किमी वरील रोड अंडर ब्रिज क्र 56 ची सखोल तपासणी केली जेणेकरून पूल, गाड्या आणि प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हाइट गेजची नियमित देखभाल केली जाईल आणि त्यानंतर चितळी-बेलापूर सेक्शन मधील 420/3-1 किलोमीटर येथील लेवल क्रॉसिंग (LC) क्र. 51 व इंटरलॉकिंगवरील
लेवल क्रॉसिंग तपासणी केली.

बेलापूर – पढेगाव विभागात 130 kmph पर्यंत पोहोचणारी हायस्पीड रन करण्यात आली होती, त्यानंतर ट्रॅक्शन सब स्टेशन आणि पढेगाव येथे नव्याने सुरू झालेल्या 10 KWP सोलर प्लांटची पाहणी करण्यात आली.
महाव्यवस्थापकांनी राहुरी -वांबोरी विभागातील किलोमीटर 390/22-14 येथे मुळा पूल क्रमांक 390/1 आणि विलाड-निंबाळक विभागातील किलोमीटर 360/10-12 येथील लेवल क्रॉसिंग क्रमांक 30 ची तपासणी केली.

अहमदनगर स्थानकावर महाव्यवस्थापकांनी रनिंग रूम, क्रू लॉबीची पाहणी केली.
श्री मीना यांनी माननीय खासदार श्री निलेश लंके यांच्याशी देखील संवाद साधला आणि माननीय खासदारांनी मांडलेल्या विविध स्थानिक समस्यांचे सकारात्मक निराकरण करण्याचे आश्वासन दिले.

यानंतर बेलवंडी ते श्रीगोंदा रोड स्थानकांदरम्यान हायस्पीड चालवण्यात आली.
श्री मीना यांनी दौंड येथील रुटीन ओव्हर हॉलींग (ROH) शेड आणि सह्याद्री क्लब सभागृहात 418.56 KWP सोलर प्लांट दूरस्थपणे कार्यान्वित केला.

अहमदनगर स्थानकावरील अमृत स्थानक योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांची महाव्यवस्थापकांनी पाहणी करून प्रवाशांच्या सुविधांशी संबंधित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा सल्ला दिला.

महाव्यवस्थापकांनी विविध ठिकाणी इतर लोकप्रतिनिधींशी संवाद साधला आणि विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी युनियन प्रतिनिधींशी चर्चा केली.

त्यांनी संपूर्ण तपासणीदरम्यान ग्राउंड-लेव्हल कर्मचाऱ्यांशी देखील सुसंवाद साधला. त्यांनी सुरक्षित ट्रेन ऑपरेशन्स आणि ऑपरेशनल कार्यक्षमतेच्या महत्त्वावर भर दिला.

श्रीमती इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे विभाग, प्रधान विभाग प्रमुख आणि मुख्यालय व पुणे विभागातील वरिष्ठ अधिकारी या निरीक्षणावेळी सोबत होते.