भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान, आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात युवती कल्याण समिती आणि मानसनीति व सामाजिक शास्त्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४व्या जयंतीनिमित्त “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले-आदर्श विचारधारा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे उपप्राचार्य प्रा. डि. एन. पाटील उपस्थित होते.
प्रा. डॉ. सौ. ममताबेन पाटील यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले-आदर्श विचारधारा या विषयांवर मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी सावित्री बाईंनी आधी स्वतः आपले पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कडून शिक्षण घेत कशा असंख्य अडचणीवर मात करत स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवली याचे वर्णन केले. तसेच आजच्या काळातील स्त्रियांनीदेखील सावित्रीबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले ध्येय साध्य करावे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवती कल्याण समिती प्रमुख प्रा. डॉ. गौरी पाटील यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार मानसनीती व सामाजिकशास्त्र मंडळ प्रमुख प्रा. डॉ. पी. एच. इंगोले यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवती कल्याण समिती सदस्य प्रा. डॉ. स्मिता चौधरी, प्रा. डॉ. सौ. विद्या पाटील, प्रा. डॉ. सौ स्वाती फालक, प्रा. स्मिता बेंडाळे, प्रा. पूनम महाजन, प्रा. संगीता भिरुड, मानसनीती व सामाजिकशास्त्र मंडळ सदस्य प्रा. डॉ. एस. के राठोड, प्रा. व्ही. ए. सोळुंके, डॉ. सचिन राजपूत आणि प्रा. श्रीपाद वाणी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



