नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका पूजनाने साजरी

जळगाव – नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फे 3जानेवारी 2025 रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती आनंदात व उत्साहाने साजरी करण्यात आली. प्रसंगी बालिका पूजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली .

तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्यां जयंतीचे औचित्य साधून महानगरपालिका शाळा क्रमांक 5 पोलीस लाईन जळगाव येथे विद्यार्थीनींचे औक्षण करण्यात आले यावेळी शालेय शैक्षणिक साहित्य व सोबत खाऊ वाटप करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक विचार विद्यार्थिनींच्या मनामनात रुजण्यासाठी अध्यक्षा सौ मनीषा पाटील यांनी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक. सौ मनीषा नेरकर , नामदेव उखंडे, गौरव गुजराती व शिक्षक वृंद उपस्थीत होतें सूत्रसंचलन. माधुरी शिंपी यांनी केले तर आभार. हर्षा गुजराती. यांनी मानले.