भुसावळ पालिका जिल्हयात ठरली गोल्ड मेडलिस्ट ; पालिकेने जिंकले एकूण 8 ट्रॉफी व 23 मेडल्स

भुसावळ – नगर विकास विभाग जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2024 – 25 अंतर्गत दि. 27 डिसेंबर 2024 ते 02 जानेवारी 2025 दरम्यान जळगाव जिल्हात क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता. यामध्ये रस्सीखेच व क्रिकेट मध्ये भुसावळ नगरपरीषदेच्या खेळाडूंनी प्रथम पारितोषिक पटकावले आहे .

क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धसह अन्य स्पर्धामध्ये पालिकेच्या अन्य खेळाडूंनी सुद्धा विजय मिळवला आहे यात बुध्दिबळ मध्ये दिपक चौधरी हे प्रथम,तर गोळा फेक ( महिला ) यामध्ये रेखा सोनवणे हे प्रथम व 100 मीटर रनिग धीरज टाक द्वितीय क्रमांकावर आलेले आहे.
सर्व विजयी टीम यांना जळगाव जिल्हा सैनिक हॉल, मायादेवी मंदिराजवळ, महाबळ, जळगाव येथे गोल्ड मेडल, व ट्रॉफी देण्यात आले भुसावळ नगरपरिषदेने एकूण 8 ट्रॉफी व 23 मेडल्स जिंकले या यशाबद्दल सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .