“नववर्षानिमित्त भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन”
नववर्षाचे स्वागत प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने करत असतो.भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त भल्या पहाटे सर्व धावपटू, सायकलपटू व योगाभ्यासक मैदानावर एकत्र येऊन धावून, सायकल चालवून व योगाभ्यास करून नवीन वर्षाची सुरुवात निरामय आरोग्याप्रती जनजागृती करून करणार आहे. सदरच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी १ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता रेल्वे ग्राउंड परिसरातील कृष्णचंद्र सभागृहाशेजारी उपस्थित राहावे असे असोसिएशनतर्फे कळविण्यात आले आहे.
महिला रनचे नावनोंदणी सुरू होणार ;
त्याशिवाय याच वेळी महिला रनचे नावनोंदणी सुरु होणार असून यासाठी अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.


