भुसावळ : येथील म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे श्री. संत गाडगे महाराज व भिमाई आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजलि वाहण्यात आली. प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुभाष जी. मेढे, जेष्ठ शिक्षिका सरला सावकारे , वरिष्ठ लिपिक प्रविण चौधरी, डॉ. प्रदीप साखरे यांच्या सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.


सर्वप्रथम शाळेचे वरिष्ठ लिपिक प्रवीण चौधरी यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला , तसेच मुख्याध्यापक एस .जी. मेढे, सरला सावकारे , डॉ. प्रदीप साखरे व सर्व शिक्षक शिक्षकांबद्दल भगिनी व विद्यार्थ्यांनी पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. ह्यावेळी शाळेचा विद्यार्थी शुभम समशेर याने व डॉ . प्रदीप साखरे, एस. टी. चौधरी, सरला सावकारे, व कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. जी.मेढे यांनी याप्रसंगी संत गाडगे महाराज व भिमाई आंबेडकर या दोन्हींच्या कार्याचा गौरव करण्यात आला व यांचे जीवन कार्य वेगवेगळ्या उदाहरणांनी पटवून दिले.

शालीनी बनसोडे, संध्या धांडे, नाना पाटील, मनोज किरंगे, ज्योती शिरतुरे, रेखा सोनवणे, पुनम देवकर,अरुण नेटके, निलेश बोराडे,लक्ष्मण पवार, कैलास चौधरी, मनोज चौधरी, राजू बागुल, मंदाबाई मोरे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. नंतर सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी शाळा परीसर स्वच्छ केला सूत्रसंचालन व आभार एन. एच.राठोड यांनी मानले.



