राज्यस्तरावरील स्केटिंग रेस स्पर्धेत भुसावळचा तिर्थराज मंगेश पाटील राज्यात तिसरा ;

छत्रपती संभाजीनगर येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद छत्रपती संभाजी नगर आणि रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित करण्यात आली होती या राज्यस्तरावरील स्केटिंग रेस स्पर्धेत नागपूर , पुणे, संभाजी नगर, जळगाव, भुसावळ, अमरावती, सांगली, सातारा, अशा अनेक जिल्ह्यांतुन विद्यार्थी सहभागी झाले होते त्यामध्ये
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद छत्रपती संभाजी नगर आणि रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित करण्यात आली होती

या राज्यस्तरावरील स्केटिंग रेस स्पर्धेत रिले मॅच व स्केटिंग रेस मध्ये अंडर 8 या गटा मध्ये तिर्थराज मंगेश पाटील राज्यात तिसरा नंबर आला त्याला 2 ब्राँझ मेडल मिळाले व पुढील महिन्यात गोवा येथे होणाऱ्या रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया नॅशनल स्पर्धेसाठी सिलेक्शन झाले आहे त्याच्या राज्य स्तरीय निवडीमध्ये सिल्वर लाईन स्पोर्ट्स अकॅडमी चे त्याचे कोच पियुष दाभाडे सर व दीपेश सोनार सर यांची खुप मेहनत आहे असे तिर्थराज पाटील याचे आई व वडिल यांनी सांगितले तिर्थराज पाटील हा भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा चिटणीस मंगेश सुभाष पाटील यांचा मुलगा आहे