→ भुसावळ
महाराष्ट्रचे प्रभारी खा. चीनी चला, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष आ. नाना पटोले, प्रदेश उपाध्यक्ष व जळगाव प्रभारी श्रीमती प्रतिभा शिंदे यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभर ईव्हीएम हटाओ संविधान बचाओ स्वाक्षरी मोहीम अभियान राबवण्यात बेगार आहे.
या अनुशंगाने भुसावळ काँग्रेस कमेटीतर्फे आज मंगळवार दि. १७ रोजी दोपारी १२ वाजता रेल्वे स्टेशन शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, २ वाजता नसरवांजी फाईल, ४ वाजता गोसीया नगर, ६ वाजता आगवाली चाळ येथे कार्यक्रम आयोजित केले आहे. यावेळी माजी आ. निळकंठ
फालक, रावेर लोकसभा जिल्हा कार्याध्यक्ष भगतसिंह पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्यक विभाग मो. मुनव्वर, अनुसुचीत विभागाचे जिल्हाध्यक्ष अँड. कैलाश शेळके, युवा काँग्रेसचे प्रदेश सचिव ईमान खान यांच्या प्रमुख उपस्थित हे अभियान राबविले जाणार आहे. जिल्हाभरातून पाच लाख स्वाक्षरी घेऊन प्रदेश काँग्रेस कमेटीला देणार आहे. तरी भुसावळ कॉंग्रेस कमेटी व सर्व फ्रेन्टल अल्पसंख्यांक विभाग, महीला काँग्रेस, सेवा दल युथ काँग्रेस, इंटक कॉंग्रेस, एसी एसटी विभागाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अल्पसंख्यांक शहराध्यक्ष सलीम गवळी, महीलाध्यक्ष यास्मीन बानो, सेवा दल शहराध्यक्ष संजय खडसे, इंटक अध्यक्ष विलास रूमात यांनी केले आहे.




