भुसावळ – येथील म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे श्री संत जगनाडे महाराज यांची जयंती व संत शिरोमणी श्री गुरुदास महाराज यांची पुण्यतिथी आज रविवार रोजी साजरी करण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापक सुभाष जी. मेढे यांनी संत श्री जगनाडे महाराज व संत शिरोमणी श्री रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले.
याप्रसंगी दोन्ही संत द्वयींच्या कार्याचा गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक सुभाष जी.मेढे सर यांनी संत श्री जगनाडे महाराज व संत शिरोमणी श्री रोहिदास यांच्या जीवन कार्याबद्दल आदरांजली पर भाषण केले . त्याचप्रमाणे शाळेचे शिक्षक एस.टी. चौधरी व प्रदीप.साखरे सर यांनी संत श्री जगनाडे महाराज व संत शिरोमणी श्री रोहिदास यांचे जीवन कार्य वेगवेगळ्या उदाहरणांनी पटवून दिलेत.

याप्रसंगी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती सरला सावकारे, श्रीमती एस.एन.बनसोडे, श्रीमती संध्या धांडे, नाना पाटील, .डी.के.भंगाळे, श्री एम. एच.किरंगे, श्रीमती ज्योती शिरतुरे, श्रीमती रेखा सोनवणे, श्री प्रवीण चौधरी, पुनम देवकर, श्री अरुण नेटके, निलेश बोराडे,लक्ष्मण पवार, कैलास चौधरी, मनोज चौधरी, राजू बागुल, मंदाबाई मोरे इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षक एन. एच.राठोड सर यांनी मानले.


