महाड – रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील शिरवली-रेवाळ गाव येथे कोकणात सुट्टीमध्ये आजीच्या गावी आलेल्या व नदीकडे गेलेल्या मुलाला वाचवण्यासाठी तिघीजणी पाण्यात उतरल्या आणि मुलासह तिघीही बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली .

सिद्धेश राजेंद्र सोनार या 21 वर्षीय मुलाला वाचण्याच्या प्रयत्नात सिद्धी गोपीचंद पेडणेकर ही सोळा वर्षीय मुलगी, काजल सोनार ही 26 वर्षीय महिला व सोनी सोनार ही 27 वर्षीय महिला हे सारे जण कुंडलिका नदीच्या प्रवाहात बुडाले. हे चौघेही नवी मुंबईतील रहिवासी असून आजीच्या गावी माणगाव तालुक्यातील शिरोली गावी ते आले होते.
हे सर्वजण नदीवर पोहण्यासाठी गेले होते. परंतु खोल पाण्याचा अंदाज आला नाही. पहिल्यांदा सिद्धेश सोनार हा पाण्यात बुडाला. त्याला वाचवण्यासाठी एका पाठोपाठ एक साऱ्याजणी उतरल्या आणि त्या चारही जण पाण्यात बुडाले. यातील दोघांचे मृतदेह आत्तापर्यंत पोलिसांच्या हात लागले असल्याची माहिती मिळाली आहे



