जळगाव – नवापूर चेक पोस्टवर नियुक्ती देण्यासाठी तीन लाखांची लाच तडजोडीअंती स्वीकारताना जळगाव आरटीओ विभागातील बड्या अधिकार्यासह खाजगी पंटराला छत्रपती संभाजी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतल्यानंतर लाचखोरांच्या गोटात प्रचंडळ खळबळउ डाली आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या एसीबीच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव आरटीओ कार्यालयात कार्यरत असणार्या एका अधिकार्याला नवापूर चेकपोस्टवर बदली करण्याच्या मोबदल्यात तीन लाखांची मागण्यात आली होती व त्यासाठी खाजगी पंटर भिकन मुकुंद भावेंनी निरोप दिला होता. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी संभाजीनगरच्या एसीबीच्या पथका सोबत संपर्क साधला. लाच मागितल्याची खात्री झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेला तक्रारदाराच्या जळगाव शहरातील राहत्या घरी भिकन भावे हे लाच स्वीकारण्यासाठी गेले आणि त्याच ठिकाणी त्यांना छत्रपती संभाजी नगरच्या एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. खाजगी इसम भिकन भावे यांनी बड्या अधिकार्याच्या सांगण्यावरून लाच स्वीकारल्याची माहिती दिल्यानंतर बड्या अधिकार्यालाही ताब्यात घेण्यात आले.
हा सापळा छत्रपती संभाजीनगर एसीबीचे डीवायएसपी सुरेश नाईकनवरे पोलीस निरीक्षक अमोल धस यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने यशस्वी केला. दरम्यान, बड्या अधिकार्याच्या अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, ठाणे येथील घरांची झडतीदेखील एसीबीचे पथक घेत असल्याचे समजते.


