भडगाव,

येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक यांच्यावर ५६ वर्षीय महिलेच्या तक्रारी नंतर विनयभंग व मारहाण केल्याचा गुन्हा भडगाव पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे.
येथील रहिवाशी असलेले माजी नगरसेवक सचिन चोरडिया हा माझ्या घरात प्रवेश करुन मला चापटा बुक्क्यांनी मारहाण करून माझ्या मनाला लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे माझ्या अंगावरची साडी ओढून हाथ पकडुन अश्लील शिवीगाळ करून तिथून निघून गेले थोड्या वेळात माझा मोठा मुलगा घरी आल्यावर त्यास ही हकीकत सांगितली.
यावरून मा. नगरसेवक सचिन विनोदकुमार चोरडिया रा. काकासट चौक भडगाव यांच्या विरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता ७४, , ७९, ३२९(४), ११५(२) प्रमाणे गन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. हे. कॉ. विजय जाधव हे करीत आहेत


