भुसावळ – येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दिनांक 28 रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते न्यायप्रणाली वरचा ताण कमी करण्यासाठी व पिडीतांना त्वरित न्याय मिळण्याचे हेतूने या लोक अदालतीचे आयोजन करण्यात येते या लोक अदालतीत कोर्टात दाखल 1293 प्रकरणात 19 प्रकरणी निकाली निघाले तर दाखल पूर्व प्रकरणात 2862 पैकी सहा प्रकरणे तडजोडीने निकाली निघाले या प्रकरणात 39 लाख 65 हजार व दोन लाख 46 हजार 800 असे एकूण 42 लाख 11 हजार 700 रकमेची वसुली झाली .
या लोक अदालतीसाठी एकूण चार पॅनलची नियुक्ती करण्यात आली होती प्रथम पॅनलला जिल्हा व सत्र न्यायाधीश व तालुका विधी सेवा प्राधिकरण भुसावळचे अध्यक्ष श्री एस्. टी. सुर साहेब व पंच सदस्य म्हणून एडवोकेट जास्वंदी एन्. भंडारी यांची नेमणूक होती द्वितीय पॅनलवर दिवाणी व फौजदारी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आर एस पांजणकर व पंच सदस्य म्हणून एडवोकेट शरद तायडे यांची नेमणूक होती दिवाणी व फौजदारी न्यायाधीश न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस.बी.तिवारी व पंच म्हणून एडवोकेट सुविधा मोरे यांनी काम पाहिले. चतुर्थ पॅनल पट्टी केसेसचे होते त्यावर दिवाणी व फौजदारी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती एस व्ही जंगम स्वामी यांनी काम केले तसेच लोक अदालतीचे यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी सतीश पाटील वरिष्ठ लिपिक तुषार वानखेडे कनिष्ठ लिपिक व इतर न्यायालयीन कर्मचारी यांनी प्रयत्न केले



