नाशिक – मुंबईकडे जाणाऱ्या अप पुष्पक एक्स्प्रेस मधून पुष्पक एक्स्प्रेसचा कोच अटेंडंट आफताब अहमद (40, रा.अमिनाबाद, लखनऊ) यास बंदी असलेल्या औषधांची वाहतूक करताना रेल्वे सुरक्षा बलाने पकडले आहे. याप्रकरणी अन्न व औषध विभागाला कळविण्यात आले असून त्यांच्याकडून पुढील कारवाई होईल, असे सूत्रांनी सांगितले.
मुंबईच्या दिशेने जाणार्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये सायंकाळी पाचला एका बोगीच्या बाथरूम जवळ तीन बॅगा ठेवण्यात आल्या असताना गस्तीवरील जवानांनी कोच अटेंडंट आफताब अहमद (40, रा. अमिनाबाद, लखनऊ) याची चौकशी केल्यानंतर त्याने सांगितले की , लखनऊ येथे राहणार्या सलमान सिद्दिकी याने बॅगांमध्ये औषधे दिली असून ती सीएसएमटीला आहेरान अहमद नामक व्यक्तीला द्यायचे आहे. त्या मोबदल्यात मला पाचशे रुपये देणार मिळणार होते.

यंत्रणेला बॅगांमध्ये गोळ्यांची पाकिटे, 160 बॉटल कफ सिरफ मिळून आले. यानंतर पोलिसांनी याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला दिली असता विभागाने ही औषधे रेल्वेतून वाहतूक करणार्यास पूर्णतः बंदी असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी कोच अटेंडंट आफताब अहमद यास ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.


