भुसावळ विभागात “स्वच्छता ही सेवा ” अभियानाच्या अंतर्गत विविध स्थानकांवर पथ नाटकांचे सादरिकरण ;

भुसावळ रेल्वे विभागात आज 27 सप्टेंबर रोजी “स्वच्छता ही सेवा” अभियानाच्या अंतर्गत स्काऊट गाइड आणि रेल्वे शाळा विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर आधारित पथ नाटक भुसावळ , मलकापूर , चाळीसगांव , देवळाली बऱ्हाणपूर , मूर्तिजापूर , शेगाव , रेल्वे स्थानकावर पथ नाटक सादर करीत स्वच्छतेचा संदेश दिला .
मलकापूर स्थानकावर श्रीमती कावेरी देवी केदारमल अग्रवाल कला महाविद्यालय विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर आधारित पथ नाटक ,सादर केले.
चाळीसगांव स्थानकावर डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर आधारित पथ नाटक ,सादर केले.
देवळाली स्थानकावर कैटोनमेंट बोर्ड देवळाली हायस्कूल विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर आधारित पथ नाटक ,सादर केले.
बऱ्हाणपूर स्थानकावर सरस्वती शिशु मंदिर हायस्कूल विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर आधारित पथ नाटक ,सादर केले.
मूर्तिजापूर स्थानकावर लोटस इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर आधारित पथ नाटक ,सादर केले.
शेगांव स्थानकावर राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघ द्वारा स्वच्छतेवर आधारित पथ नाटक ,सादर केले.
अकोला स्थानकावर रेल यात्री एकता मजदूर संघ (महिला टीम) द्वारा स्वच्छतेवर आधारित पथ नाटक ,सादर केले.

या नाटकाच्या माध्यमातून प्रवाशांमध्ये स्वच्छ रेल सुंदर भारत या बद्दल जनजागृती करण्यात आली. रेल्वे स्थानक व परिसराची स्वच्छता राखणे, सार्वजनिक ठिकाणी घाण करू नये आणि रेल्वेच्या स्वच्छता मोहीमेत सर्वांनी सहभाग घेण्याचे महत्व पटवून देण्यात आले.


यावेळी प्रवाशांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि स्वच्छता मोहीमेसाठी रेल्वेच्या प्रयत्नांचे कौतुक केले. नुक्कड नाटकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वच्छता आणि स्वच्छ परिसर राखण्याचे महत्व प्रभावीपणे मांडले.
रेल्वे प्रशासनातर्फे स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती प्रवाशांना देण्यात आली. यामध्ये रेल्वे स्थानकावरील स्वच्छता मोहीम, कचरा व्यवस्थापन, आणि स्वच्छ रेल्वे, सुरक्षित प्रवास यावर भर देण्यात आला आहे.
रेल्वे स्थानकाच्या परिसरातील स्वच्छता आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.