भुसावळात भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे

भुसावळ – भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे हे मंगळवार, 10 सप्टेंबर रोजी उत्तर महाराष्ट्राच्या दौर्‍यावर असून ते भुसावळातही भेट देणार आहत. अनुप मोरे यांच्या उपस्थितीत भाजयुमो शाखांचे उद्घाटन होणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष चंद्रशेखर रामेश्वर अग्रवाल यांनी दिली.
प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे हे मंगळवारी शहराच्या दौर्‍यावर येत असल्याने भाजपा युवा मोर्चा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याप्रसंगी त्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या शाखांचे अनावरण होणार आहे.