भुसावळ – कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथे विविध स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले.या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून जळगाव विभागाचे सेवा व वस्तू कर विभाग उपआयुक्त सुर्यकांत कुमावत उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सेक्रेटरी विष्णू चौधरी, संस्थेचे कोषाध्यक्ष संजय कुमार नाहाटा, प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. वाय. एम. पाटील, कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षिका श्रीमती प्रा.स्वाती पाटील, करियर समुपदेशन व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख प्रा.डॉ.चंद्रकांत सरोदे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि प्रमुख वक्ते सुर्यकांत कुमावत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून नियोजनबद्ध अभ्यास करावा. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रम लक्षात घेऊन त्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध मासिके, वर्तमानपत्राचे वाचन करावे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण करून छंदात रूपांतर केले तर लवकर यशस्वी होता येते. अध्यक्षीय भाषणात डॉ मोहन फालक म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साधण्यासाठी स्पर्धा परीक्षेकडे लक्ष केंद्रित करावे आपल्या महाराष्ट्रामध्ये आता जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत आहे ही अभिमानाची बाब आहे. आपण पण स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून महाविद्यालयाच्या नाव लौकिकात भर टाकावी असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.चंद्रकांत सरोदे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिपक पाटील यांनी केले, प्रमुख अतिथींचा परीचय डॉ.प्रफुल्ल इंगोले यांनी केला तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ.ममता बेन पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. गौरी पाटील, प्रा. डॉ. आर एस नाडेकर, प्रा.डॉ.विलास महिरे, प्रा. डॉ.उमेश फेगडे, प्रा. हर्षल पाटील, प्रा.डॉ सचिन कोलते, प्रा.डॉ. सचिन राजपूत,प्रा.नीलिमा पाटील, प्रा. डॉ.अजय क्षीरसागर व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो ओळ —- सूर्यकांत कुमावत (उपआयुक्त वस्तू व सेवाकर विभाग जळगाव) यांचे महाविद्यालयातर्फे स्वागत करताना ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक सोबत संस्थेचे सेक्रेटरी विष्णू चौधरी, संस्थेचे कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस व्ही. पाटील व इतर मान्यवर


