त्याग ,शौर्य व हरितक्रांतीचा प्रतिक असलेल्या भारताला स्वर्णिम भारत बनवू या – बी. के. सिंधू दिदी : ब्रह्मकुमारी सेवा केंद्रातर्फे स्वातंत्र्य दिन व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न :


भुसावळ –
येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालय यावल रोड वरील सेवा केंद्रात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ब्रह्मकुमारी परिवारा मार्फत गुरुवार रोजी सकाळी केंद्राच्या संचालिका बीके सिंधू दीदी तसेच भुसावळचे माजी नगरसेवक तथा भुसावळ तालुक्याचे लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष राजेंद्र आवटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .त्यानंतर सिंधू दीदी यांनी भारताचे स्वातंत्र्य व तिरंगा ध्वजाचे महत्व त्यातील रंगाचे महत्त्व विशद करताना त्याग शौर्य हरितक्रांती अखंड भारत याचं विश्लेषण करताना भारताला आज जी अवस्था प्राप्त झाली आहे त्यातून बाहेर काढून भारताला अखंड भारत बनवून स्वर्णिम भारत सतीयुगी भारत बनवून खऱ्या अर्थाने जगाला दिशा दाखवणारा भारत निश्चितच घडू या असे आवाहनही त्यांनी केले यानंतर नगरसेवक राजूभाऊ आवटे यांनी अध्यात्मिक चे महत्व विशद करून लाडली योजनेबद्दल माहिती दिली आतापर्यंत भुसावळ मध्ये 34000 पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे सर्वांनी याचा लाभ घ्यावा जे सहकार्य लागेल ते मी करण्यास तयार आहे असे आवाहनही या ठिकाणी त्यांनी केले .कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करण्यात आली कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक राजेंद्र आवटे नरेंद्र यादव पर्यावरण जागरण प्रतिष्ठानचे नाना पाटील सर हिरवांकुर संस्थेच्या सौ सोनाली राजपूत उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी के ज्योती दीदी यांनी तर कविता दीदी, सुमन माता , परि यांनी गिते सादर केली तर डिंपल मुक्ता यांनी नृत्य सादर केले . आभार बी के अनिल भाई यांनी केले . कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात ओम शांती परिवारातील सर्व माता भगिनी बंधू व परिसरातील नागरिक उपस्थित होते .