भुसावळ (प्रतिनिधी ) – प्रतिवर्षानुसार यंदाही येथील अग्रवाल महिला मंडळातर्फे १५ मार्च रविवार रोजी गणगौर सण उत्साहात संपन्न झाला .
स्थानिक बालाजी गल्ली येथून वाजत गाजत डोक्यावर सजविलेल्या गणगौर (शिवपार्वती प्रतिमेची )ची मिरवणूक काढण्यात आली . यावेळी सहभागी महिलांनी भक्तीगीत सादर केली . तर अनेक महिलांनी वादयाच्या तालावर ठेका धरला . मिरवणुकीत मंडळ अध्यक्षा शीतल राजेश अग्रवाल , नेहा अग्रवाल, रेखा अग्रवाल, संगीता अग्रवाल, नीलम अग्रवाल, कामिनी अग्रवाल , अलका अग्रवाल, ऋतुअग्रवाल , दिप्ती अग्रवाल, सुनिती अग्रवाल, यांचेसह मोठ्या संख्येने समाज बांधव भगिनीनी सहभागी होऊन आनंदोत्सव साजरा केल्याची माहिती अनूप अग्रवाल व जे. बी. कोटेचा यांनी दिली .



