भुसावळ विभागात 9 स्थानकांवर विभाजन स्मृती दिन साजरा :


भुसावळ –
भुसावळ रेल्वे विभागात 9 स्थानकांवर विभाजन स्मृती दिन साजरा केला. दिनांक 14.8.2024 रोजी आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून फाळणीची भीषणता दर्शविणारे पथनाट्य आणि इतर कार्यक्रमांची छायाचित्रे, दृश्ये आणि माहिती प्रदर्शित करणारे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते प्रदर्शनही डिजिटल पद्धतीने प्रदर्शित करण्यात आले.
भुसावळ विभागात भुसावळ, धुळे, मनमाड ,नाशिकरोड, खंडवा, बुर्‍हाणपूर, शेगाव, अकोला आणि अमरावती या नऊ स्थानकांवर प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रदर्शनामध्ये भुसावळ स्थानक येथे स्वातंत्र्यसैनिक प्रभाकर पुनमचंद बागुल व स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवा श्रीमती उषा वाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय , अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रशासन सुनील कुमार सुमन , अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक तांत्रिक एम के मीना , आणि विभागातील इतर शाखा वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले.