मध्य रेल्वे प्रवाशांच्या आरोग्य सेवेसाठी वचनबद्ध आहे-प्रवासा दरम्यान वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांसाठी डॉक्टर-ऑन-कॉल सेवा प्रदान :

मध्य रेल्वेने आपत्कालीन वैद्यकीय सेवा वाढविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, प्रवासादरम्यान वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी डॉक्टर्स ऑन कॉल सेवा २४/७ हा वैद्यकीय सहाय्य कार्यक्रम चालवला आहे.

करुणा आणि समर्पणाच्या प्रशंसनीय प्रदर्शनात, डॉक्टरांची एक टीम वैद्यकीय उपचाराची गरज असलेल्या प्रवाशांच्या कॉलवर उपस्थित राहते.
प्रवासादरम्यान वैद्यकीय मदतीची गरज असलेल्या किंवा वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत रेल मदद ॲप मार्गे पुढच्या स्थानकावर किंवा ट्रेन कंडक्टर / प्रवासी तिकीट परीक्षक किंवा ट्रेन व्यवस्थापकाशी संपर्क साधून डॉक्टरांच्या सेवांचा लाभ घेऊ शकतात. रेल मदद ॲप कडून किंवा ट्रेन कंडक्टर/टीटीई/ट्रेन मॅनेजर मार्फत पुढील येणाऱ्या स्टेशनच्या ऑनड्युटी स्टेशन व्यवस्थापकाला संदेश पाठवला जातो जेथे डॉक्टर आणि पॅरामेडिक्सची वैद्यकीय टीम उपस्थित राहण्यासाठी तयार असते. वैद्यकीय मदत ताबडतोब पुरविली जाते तसेच कोणतीही मोठी समस्या उद्भवल्यास प्रवासी जवळच्या रुग्णालयात वैद्यकीय मदत घेऊ शकतात.

नुकत्याच घडलेल्या एका घटनेत मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस या ट्रेन क्रमांक 22114 कोचुवेली – लोकमान्य टिळक टर्मिनस अतिजलद एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला छातीत दुखू लागले. त्यांच्या नातेवाइकांनी रेल मदद च्या माध्यमातून मदत मागितली. लोकमान्य टिळक टर्मिनसच्या उप स्टेशन अधीक्षकांनी वैद्यकीय पथकासह वेळेवर मदत केली आणि प्रवाशाला महत्त्वाच्या वेळी जवळच्या रुग्णालयात पोहोचण्यास मदत केली. प्रवाशाला वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्याने तो वाचला.

दुसऱ्या प्रकरणात दि ०६.०६.२०२४ रोजी 17412 कोल्हापूर – मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये बसलेल्या एका महिलेला लोणावळा येथून ट्रेन सुटली तेव्हा प्रसूती वेदना सुरु झाल्या. मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई केली आणि कर्जत येथे एक टीम तयार केली जिथे महिलेला रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा तिने एका निरोगी बाळाला जन्म दिला.

आणखी एका उल्लेखनीय प्रकरण म्हणजे 12293 लोकमान्य टिळक टर्मिनस – प्रयागराज दुरांतो एक्स्प्रेसच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी दि. ०३.०४.२०२४ रोजी सहप्रवाशाच्या मदतीने एका महिलेला तिच्या बाळाला जन्म देण्यात मदत केली.

मध्य रेल्वेच्या टीमने अशा अनेक घटनांमध्ये आपल्या जलद कारवाईने आजारी प्रवाशांना आवश्यक ती मदत केली आहे.

मध्य रेल्वेच्या डॉक्टर-ऑन-कॉल टीमने दि. ०१.०६.२०२४ ते दि. ३१.०७.२०२४ या कालावधीत एकूण २०१९ प्रवाशांना उपस्थित राहून वैद्यकीय मदत दिली आहे. यामध्ये नागपूर विभागातील ८१५, भुसावळ विभागातील ५८७, पुणे विभागातील २९७, सोलापूर विभागातील २३६ आणि मुंबई विभागातील ८४ प्रवाशांचा समावेश आहे.

मध्य रेल्वेला आपल्या वैद्यकीय विभागाचा, त्यांच्या त्वरित प्रतिसादासाठी आणि तज्ञांच्या काळजीसाठी डॉक्टर्स ऑन कॉल टीम आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत उपस्थित राहण्यासाठी आणि अल्प सूचनेवर जीव वाचवण्यास मदत करणारे सर्व कर्मचारी यांचा अभिमान आहे.