बस स्टॅन्ड परिसरात मुरुम टाकून प्रवाशांना दिलासा :

नाना पाटील सर व नगरपरिषदेचे सहकार्य
आगार प्रमुख राकेश शिवदे


भुसावळ
गेल्या आठवड्यापासून पावसाची रिमझिम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने बस स्टँड परिसरात अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले त्यामुळे प्रवाशांना त्रास होत होता आज त्या ठिकाणी मुरूम टाकून तो पसरविण्यात आला त्यामुळे बस चालक व प्रवाशांना दिलासा मिळाला या कामी पर्यावरण जागर प्रतिष्ठान व हरित शहर स्वच्छ शहर संकल्पना राबविणारे व सोबतच सामाजिक कार्य करणारे नाना पाटील सर यांच्या सहकार्याने नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे व आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख श्री माकोडे यांनी जेसीबी पाठवून सहकार्य केले व बस स्टँड परिसरात पाणी साचलेल्या जागेवर मुरूम पसरवण्यात आला .यावेळी प्रत्यक्ष नाना पाटील सर यांनी उपस्थित राहून कार्य करून घेतले .नाना पाटील सरांचे आम्हाला अनेक कामात नेहमी सहकार्य मिळत असते यावेळी नगरपालिका अधिकारी यांनीही सहकार्य केले असे आगार प्रमुख राकेश शिवदे यांनी सांगितले .
दोष दाखवण्यापेक्षा सहकार्य करा – नाना पाटील सर
भुसावळ शहराचा आरसा रेल्वे स्टेशन व बस स्टॅन्ड परिसर असतो मोठ्या प्रमाणात बाहेरील मंडळी प्रवासी त्या परिसरातून ये जा करतात . त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया या खेदजनक असतात अश्यावेळी दोष दाखविण्या पेक्षा काही सहकार्य करता येईल का? शक्य असेल ते सहकार्य करण्याचा प्रयत्न असतो . या कामी नगरपरिषदे चे सिर्ईओ महेश वाघमोडे व आपत्ती व्यवस्थापन प्रमुख माकोडे यांनी केवळ एका मॅसेज वर त्वरीत JCB उपलब्ध करून दिले . त्यांच्या सहकार्यांने मुरुम पसरविण्याचे कार्य करता आहे . माझ शहर हरीत शहर स्वच्छ शहर करू या छोट्या छोटया प्रयत्नातून कार्य करू असेही नाना पाटील म्हणाले .