अस्थी रक्षा विसर्जनातून लावले स्मृतीचे वृक्ष , स्मृती वृक्ष लावून जलप्रदूषण ही टाळूया -बी. के . ज्योती दीदी : देशमुख व शिंदे परिवाराने केला पर्यावरण जागर प्रतिष्ठानचा उपक्रम :


भुसावळ
भुसावळ येथील नुकतेच निलेश देशमुख यांच्या आई श्रीमती सुनंदा देशमुख यांचे दुःखद निधन झाल्याने त्यांनी व त्यांची बहीण रेणुका पाटील पाहुणे किशोर पाटील व बी के अनिल पाटील यांनी श्रीमती सुनंदा देशमुख या आईच्या अस्थी व रक्षा नदीत न टाकता खड्ड्यांमध्ये टाकून त्यावर स्मृतीचे वड पिंपळ बकूळ कंदम करंज आदी वृक्ष ट्री गार्ड स्मृति चे पाच वृक्ष लावले . वृक्ष लावण्याच्या वेळी ब्रहमाकुमारी सेवा केंद्राच्या बी के ज्योती दीदी यांनी देशमुख परिवाराने अस्थि रक्षा विसर्जनातून स्मृतीचे वृक्ष लावले यामुळे जलप्रदूषणही वाचते व पर्यावरणाचे रक्षण होते वृक्षांचे संवर्धनही होते .वृक्ष लावणे आज काळाची गरज आहे प्रत्येकाने स्मृती जपण्यासाठी वृक्ष लावावा असे म्हटले त्यानंतर साकेगाव सेवा केंद्राच्या बी के रुखमा दिदी यांनीही वृक्ष लावणे काळाची गरज आहे वृक्षांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतोच पण आपल्या आरोग्य ही चांगले राहते प्रदूषण रोखण्यास मदत होते म्हणून प्रत्येकाने वृक्ष लावणे आवश्यक आहे नाना पाटील यांनी देशमुख परिवार व शिंदे परिवार यांनी पर्यावरण जागा प्रतिष्ठानच्या उपक्रमात सहभाग घेऊन अस्थि रक्षा विसर्जनातून आईचे स्मृतीचे वृक्ष लावले .व जल प्रदूषण वाचवण्यासाठी सुद्धा कार्य केलं याबद्दल त्या परिवारांला धन्यवाद दिले . यावेळी वेणूमाता एच डी परदेशी ऐ एस शेकोकारे श्रीमती शुभांगी पाटील अनिल भाई व इतर नातेवाईक उपस्थित होते .