राधाकृष्ण प्रभात फेरी परिवारातर्फे नैसर्गिक रंगांची उधळन : पारंपरिक वाद्याचे तालावर जल्लोष ;

येथील राधाकृष्ण प्रभात फेरी परिवारातर्फे भक्तीरसात रंगाची उधळन करीत मंगळवारी होलिकोत्सव साजरा करण्यात आला . पहाटे ६ वाजता शहरात निघालेल्यां या प्रभात फेरी मध्ये भक्तिगीतांच्या तालावर नैसर्गिक रंग व फुलांची उधळन करून भजनी मंडळी थिरकली .लक्ष्मी चौकातील श्री राम मंदिर येथे प्रभातफेरी आल्यानंतर सहभागी सर्व परिवाराने एकमेकांना कोरडे नैसर्गिक रंग लावून फुलांची उधळन करून पारंपरिक वाद्य व शंखनाद करुन भजने व भक्तिगीत सादर करीत तल्लीन होत नाचुन जल्लोषात धूलिवंदनाचा आनंद लूटला . यावेळी संजय अग्रवाल, राधेश्याम लाहोटी ,मनोज बियाणी , प्रेमाराम लड्ढा, श्रीकांत लाहोटी, सुनील लाहोटी, डॉ. देवेंद्र शर्मा , रामा पठाडे, जगदीश शर्मा, मूलचंद लाहोटी, अन्नू अग्रवाल, अर्जुनभाई पटेल,लालजी भाई पटेल, लीलाधर अग्रवाल , यांच्यासह प्रभात फेरि परिवार सदस्य व परिसरातील नागरिक तसेच महिलां मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या त्यांनी नैसर्गिक रंगाची व फुलांची उधळन करून रंगोत्सव साजरा केला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *