रेल्वेने मुंबई-रीवा आणि पुणे-जबलपुर विशेष गाड्यांच्या ५२ फेऱ्या वाढवल्या आहेत

रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त लक्षात घेऊन रेल्वे मुंबई ते रीवा आणि पुणे आणि जबलपुर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांचा कालावधी पुढीलप्रमाणे वाढवेल:
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-रीवा विशेष
02188 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- दर शुक्रवारी दि. २८.०६.२०२४ पर्यंत रीवा विशेष अधिसूचित आता १३ फेऱ्यांसाठी दि. २७.०९.२०२४ पर्यंत वाढविण्यात येत आहे.
02187 रीवा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मुंबई विशेष प्रत्येक गुरुवारी दि. २७.०६.२०२४ पर्यंत अधिसूचित आता १३ फेऱ्यांसाठी दि. २६.०९.२०२४ पर्यंत वाढविण्यात येत आहे.
पुणे-जबलपुर विशेष
02131 पुणे-जबलपुर विशेष दर सोमवारी दि. ०१.०७.२०२४ पर्यंत अधिसूचित आता १३ फेऱ्यांसाठी दि. ३०.०९.२०२४ पर्यंत वाढविण्यात येत आहे.
02132 जबलपुर-पुणे विशेष दर रविवारी दि. ३०.०६.२०२४ पर्यंत अधिसूचित केले आहे, आता १३ फेऱ्यांसाठी दि. २९.०९.२०२४ पर्यंत वाढविण्यात येत आहे.
दिवस, वेळ, संरचना आणि थांबा यामध्ये कोणताही बदल होणार नाही.
आरक्षण: विशेष शुल्कावर विशेष ट्रेन क्रमांक 02188 आणि 02131 च्या विस्तारित फेऱ्यांसाठी बुकिंग दि. २९.०६.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल.
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया http://www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


