आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्त ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ मध्ये विविध कार्यक्रम

भुसावळ –

21 जून 2024 ऑर्डिनेंस फॅक्टरी भुसावळ येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस आयोजित करण्यात आला. योग दिवसाचे औचित्य साधून योगाचे महत्व व त्याचा व्यापक प्रचार , प्रसार आणि योगा बद्दल जनसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि योगाला दैनंदिन जीवनात सामील करून घेणे यो उद्देशाने 19 जून 2024 रोजी सर्वअधिकारी, कर्मचारी यांच्या मुल आणि मुलींसाठी सीनियर क्लब येथे दुपारी
3: 30 मिनिटाला चित्रकला स्पर्धेचआयोजन करण्यात आले होते . त्या मध्ये मोठ्या संख्येने मुले आणी मुलींनी सहभाग नोंदविला.
20 जून 2024 या दिवशी प्रत्येक घराच्या आंगणामध्ये योगा अंतर्गत
सकाळी सहा ते सात काहींनी संध्याकाळी चार ते सहा च्या वेळात योग अभ्यास केला.
21 जून 2024 रोजी सामूहिक योग अभ्यास सकाळी सहा ते सात या वेळात आयोजित केला गेला.
यावेळी चित्रकला स्पर्धेमध्ये पहिला , दुसरा आणि तिसरा नंबर घेणाऱ्या मुलांना आणि मुलींना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
या वेळी कार्यकारी निदेशक ऑर्डिनेंस फॅक्टरी भुसावळ श्री विनीत शर्मा यांनी आपले विचार मांडताना म्हणाले की फॅक्टरी मधील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व त्यांचे परिवारातील सदस्यांनी योगाचे महत्त्व समजून प्रत्येक दिवशी योग करायला पाहिजे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे बॅलेंसिंग पावर वाढवणे यावर विशेष लक्ष केंद्रित केले पाहिजे, योगाच्या प्रति जागरूकता आणि प्रचार, प्रसार करणे ही सर्वांची जबाबदारी आहे असे ते म्हणाले
योग अभ्यास योग प्रशिक्षक मधुकर .एस.राऊत यांनी करुण घेतला .
कार्यक्रमांमध्ये ऑर्डिनेंस फॅक्टरी चे सर्व अधिकारी, कर्मचारी बंधू आणि भगिनी व युनियन असोसिएशनचे पदाधिकारी जे सी एम चे मेंबर कार्य समिती सदस्य उपस्थित होते
कार्यक्रम अत्यंत आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाला ज्यामध्ये आभार प्रस्ताव
श एस आर पाटील
कनिष्ठ कार्यशाळा प्रबंधक यांनी मानले