भुसावळ –
दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील 5 जून 2024 रोजी भुसावळ विभागात “जागतिक पर्यावरण दिन” साजरा करण्यात आला. रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या आदेशानुसार, या वर्षीची थीम जमीन पुनर्संचयित करणे, वाळवंटीकरण आणि दुष्काळ यावर केंद्रित आहे वृक्षारोपण, पथनाट्य, परिसंवाद आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 05.06.2024 रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे यांच्या हस्ते जनजागृती रॅलीचे उदघाटन करण्यात आले आणि रॅलीचा समारोप स्काऊट गाईड ग्राउन्ड येथे करण्यात आला.

याठिकाणी विविध प्रजातींची ६० रोपे (फळे आणि ऑक्सिजन उत्सर्जित करणारी) लावण्यात आली तसेच स्काऊट गाईड सदस्यांतर्फे पथनाट्याचे आयोजन करण्यात आले आणि ज्यूट पिशव्या (फळे, फुलांच्या बिया, बांबू इत्यादी वस्तू) वाटण्यात आल्या. या वेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे यांनी भारत स्काऊट गाईड सदस्यांना रु १० हजार चे बक्षीस जाहीर केले. यांत्रिक विभागाला रु १० हजार चे पारितोषिक घोषित करण्यात आले.
मूलभूत प्रशिक्षण केंद्रात “नेट झिरो कार्बन उत्सर्जन” या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून विभागातील आवारात, डेपोमध्ये आणि स्थानकांमध्ये एकूण 1625 रोपांची लागवड करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भुसावळ विभागातील रेल्वे कर्मचारी, रेल्वे शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, बेसिक ट्रेनिंग सेंटर (बीटीसी) चे प्रशिक्षणार्थी, निरीक्षक, प्रशिक्षक आणि अधिकारी यांनी सहभाग घेतला, यावेळी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) सुनील कुमार सुमन, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक ( तांत्रिक) श्री एम के मीना, सर्व शाखांचे अधिकारी, कर्मचारी, भारत स्काऊट गाईड चे सदस्य सहभागी होते.


जनजागृती रॅलीत सहभागी श्रीमती इति पांडे व अधिकारी व कर्मचारी



