दुहेरी खून प्रकरण ; आरोपीना फाशीची शिक्षा व्हावी – महिलांचे प्रातांना निवेदन –


भुसावळ – शहरातील सातारा भागात मुख्य रस्त्यावर मरीमाता मंदिर जवळ ( दिनांक २९) मे रोजी माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे हे दोघे स्विफ्ट डिझायर गाडीने जळगांव नाक्याकडे येत असतांना मोटारसायकली ने मारेकरी येवून वाहन अडवून दोघांचा रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान दुहेरी खून केल्याने खळबळ उडाली होती.या घटनेतील मारेकरी मोकाट फिरत असून यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या अनुषंगाने महिलांनी मोर्चा काढून प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन दिले.

या घटनेला घडून आठवडा पालटला आहे. माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे या दोघांना गोळ्या झाडून मारेकरी पसार झाले आहे.या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी राजू सूर्यवंशी,विनोद चावरीया, करन पथरोड तसेच यावल तालुक्यातील अकलुद गावामधिल किरण कोळी या चौघांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केले आता सहा जून पर्यंत पोलीस कोठडी सूनविली आहे.

दुहेरी खून प्रकरणात पोलीस प्रशासन कासवाच्या गतीने काम करीत आहे.गुन्ह्यातील संशयित आरोपी मोकाट फिरत असल्याने बारसे परिवार व त्यांच्या नातेवाईकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे.परिसरात दहशत निर्माण झाली आहे.सदरील गुन्ह्यातील संशयित आरोपी पंधरा बंगला,आठ खोली भागात रात्री घरी येत असून पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपी महिलांनी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या दालनात निवेदन देतांना केला.

शहरातील वाल्मिक नगर चौकातून दुपारी बारा वाजेला हजारो महिला व किन्नर रस्त्यावर उतरून दुहेरी खून प्रकरणातील संशयित आरोपींना फाशीची शिक्षा दया, मोकाट फिरणाऱ्या आरोपींना अटक करा तसेच दुहेरी खून प्रकरणातील आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवून त्यांना अद्दल घडवा त्याचप्रमाणे संशयित आरोपींची उच्च स्तरीय चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये खटला चालवून कठोर कारवाई व्हावी.तसेच संघटित संघटित गुन्हेगारी करणाऱ्या आरोपींना मोका सारखे कठोर कायदा अन्वये कारवाई व्हावी असे नारेबाजी करीत मोर्चा वाल्मिक नगर, बाजारपेठ पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन, गांधी पुतळा पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहचल्यावर “आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे” या घोषणाबाजी ने परिसर दणाणून सोडला.यानंतर आठ ते दहा महिलांनी विविध मागण्यांचे निवेदन उपविभगिय अधिकारी जितेंद्र पाटील यांना दिले.

याप्रसंगी निवेदनावर उषाबाई किशोर घारु,इंद्राबाई श्यामजी जाधव,शालिनी अनिलजी लोट,करुणा अजय बारसे, ज्योती राजपाल बारसे,खुशाली टिळक चंडाले,नितु गणेश चावरिया,दुर्गा संजय नवगिरे, सुरेखा जितेंद्र ठाकूर,गीता प्रकाश चंडाले अशांच्या सह्या आहेत.