गारखेडा येथील आदिवासी बांधवांच्या भोंगऱ्या उत्सवात रंगले डॉ.कुंदन फेगडे ; आदिवासी बांधवांना दिल्या भोंगऱ्या उत्सवाच्या शुभेच्छा ;


यावल
रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गारखेडा येथे पारंपारिक पध्दतीने होळीच्या पार्श्वभुमीवर आदिवासी समाज बांधवांचा वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे होळी निमित्त भोंगऱ्या बाजार भरवला जातो आणि हा उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवात आश्रय फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे स्वत: सहभागी होत आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या. आदिवासी पारंपारीक वाद्य वाजवत आदिवासी बांधवांसोबत रंगले. आदिवासी बांधवांनी आकर्षक वस्त्र परिधान करून विविध लोकगीतांच्या संगीतावर नृत्य सादर केले. यावेळी डॉ.कुंदन फेगडेंसह जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोमतीताई बारेला, ग्रामपंचायत सदस्य महेश बारेला, रामलाल बारेला, दिनेश चव्हाण, गाठू बारेला, रमेश बारेला सह आदींची उपस्थिती होती.