महाशिवरात्री ब्रह्माकुमारीज् तर्फे अनेकाविध कार्यक्रम : सर्व आत्माओके पिता एक नाटिकेद्वारे सुंदर संदेश :

भुसावळ
ब्रह्माकुमारीज् तर्फे महाशिवरात्री पर्वानिमित्त सेवाकेंद्र तर्फे विविध कार्यक्रम चे आयोजन केले गेले.
कार्यक्रमाला शहरातील स्वामीनारायण गुरुकुल चे सचिव ऋषिप्रसाद शास्त्री महानुभाव पंथाचे प्रमुख महंत प्रभाकर शास्त्री बाबा जैन समाजाचे संघपती प्रेमचंद जी कोटेच्या मुस्लिम धर्माचे साबीर शेख महानुभाव पंथाचे हंसराज शास्त्री त्याचप्रमाणे गोदावरी संस्थेच्या डॉक्टर केतकी पाटील व्यासपीठावर उपस्थित होते सेवा केंद्राच्या ज्योतीबहन व कविता बहन यांनी मान्यवरांचे स्वागत केले .भुसावळ सेवा केंद्राच्या

मुख्य प्रशासिका बीके सिंधू दीदी

यांनी महाशिवरात्रीचे महत्त्व सांगून परमेश्वर शिव या पृथ्वीवर अवतरण होऊन नव्या सृष्टीची स्थापना करत आहेत आपण एक आहोत धर्म वेगळे असतील पंथ वेगळे असतील परंतु आत्मरूपानेआपण एकच आहोत ज्या ज्या वेळी धर्माची ग्लाणी होत असते .त्या त्या वेळी परमेश्वर अवतरण घेत असतो व नव्या सृष्टीची स्थापना करत असतो आता ह्या कलियुगाचा अंतिम समय आलेला आहे आपण खऱ्या परमेश्वराला ओळखा असे आवाहन सिंधू दीदी यांनी केले साकेगाव सेवा केंद्राच्या रुक्माई यांनीही शिव परमात्म्याचा परिचय व महाशिवरात्रीचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले .यानंतर

प्रभाकर शास्त्री महंत

यांनी धर्म म्हणजे धारण करणारा तो धर्म ज्याप्रमाणे पाण्याचा धर्म शीतल आहे कितीही त्याला उष्णता दिली तरी काही कालावधीनंतर पाणी थंड होत असते तसे आपला धर्म शांतीने प्रेमाने वागण्याचा आहे आपण तसे वागू या यानंतर

स्वामीनारायण पंथाचे कृषी प्रसाद

यांनी भारतीय संस्कृती खूप महान आहे ती बाह्य वातावरणामुळे बिघडत चाललेली आहे दुर्गुणांची संख्या जास्त वाढत आहे .ती कमी होणे गरजेचे आहे .आपण सर्वांनी पंचमहाभूते काम क्रोध लोभ मोह अहंकार यांची निंदनी करणे आवश्यक आहे तरच आत्मरुपी शेती धान्य सकस येईल आणि एक चांगला विचारांची सृष्टी निर्माण होईल असे विचार त्यांनी व्यक्त केले यानंतर
जैन समाजाचे संघपती प्रेम भाऊ कोटेच्या

यांनी नारीशक्तीचे महत्त्व सांगून आज नारीशक्ती ही सशक्त होऊन समाजाला मार्गदर्शन करत आहे .एकमेकांना प्रेम देऊया त्याग दुढनिश्चय करून नव्या सृष्टी स्थापनेत सहकार्य करूया असे मत त्यांनी व्यक्त केले .

मुस्लिम समाजाचे शाबीर शेख

यांनी परमेश्वर निराकार असून आज सर्वांमध्ये सद्भाव सहकार्य होणे गरजेचे आहे असे सदभावनेचे कार्यक्रम होणे गरजेचे आहे असे यावेळी त्यांनी सांगितले दीपनगर येथील इंजिनियर रवींद्र सोनकुसरे आज समाजात मॉडल एज्युकेशन ची आवश्यकता असून त्याचे शिक्षण देणे गरजेचे आहे यानंतर

डॉक्टर केतकी ताई पाटील

यांनी पहिल्यांदा एकाच वेळी महाशिवरात्री व महिला दिन एकत्र आले एकीकडे महादेवाचे पूजन तर दुसरीकडे पार्वतीची पूजा याचा अर्थ महिलांवर खूप जबाबदारी आल्या आहेत आणि यासाठी अध्यात्मिक ताकद असणे गरजेचे आहे .तरच कोणतीही कार्य शांतता प्रेमाने होऊ शकेल

.अशा भावना मान्यवरांनी या ठिकाणी व्यक्त केल्या . या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात आले होते यानंतर दीप प्रज्वलन करून शिव ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळी नाना पाटील सर यांनी प्रमुख पाहुण्यांसह सर्व उपस्थितांना शुभ संकल्पाची प्रतिज्ञा दिली त्यानंतर शिवजन्मोत्सव म्हणून 88 वा केक कापण्यात आला .त्यानंतर सर्व मान्यवरांना सर्व आत्मा के पिता शिव परमात्मा यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवा केंद्राच्या ज्योती दीदी व कविता दीदी यांनी केले आभार प्रदर्शन नाना पाटील सर यांनी मानले या कार्यक्रमासाठी विशेष बिके अनिल भाई शिंदे यांनी विशेष मेहनत घेऊन त्यांना नितीन चौधरी रितेश वाघोदे दिलीप महाजन कुकरेजा भाई विजय सिंधी भाई प्रभाकर भाई गोपाल भाई त्याचबरोबर सेवा केंद्रातील भाई बहिणी यांनी खूप मोलाचे सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला .कार्यक्रमाला पंचक्रोशीतूनही ब्रह्मकुमार परिवारातील सदस्य उपस्थित होते .कार्यक्रमाच्या सुरुवातीला साकेगाव सेवा केंद्राच्या रूखमादीदी उपस्थितांकडून एक्सरसाइज करून घेतली आणि सर्वांची मन प्रफुल्लित ताजी टवटवीत करण्याचा प्रयत्न केला .
शिवध्वजारोहन बीके सिंधू दीदी रूखमा दीदी ज्योती दीदी कविता दीदी महंत प्रभाकर शास्त्री परमपूज्य कृषी प्रसाद शास्त्री शाबीर शेख प्रेम भाऊ कोटेच्या हंसराज शास्त्री रवींद्र सोनकुसर बीके अनिल भाई व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते शिवध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी अवगुणमुक्त, व्यसनमुक्त, विकारमुक्त करण्यासाठी शिवप्रतिज्ञाही उपस्थितांना नाना पाटील सर यांनी दिली.