भुसावळ (प्रतिनिधी )-
चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त मध्य रेल्वेच्या भुसावळ रेल्वे स्थानकावरुन धावणा-या १० गाड्यांना विंध्याचल रेल्वे स्थानकावर तात्पुरत्या स्वरुपात थांबा देण्यात आला आहे.
चैत्र नवरात्र मेळ्याच्या निमित्ताने २५ मार्च ते ८ एप्रिल दरम्यान
गाडी क्रमांक – १२३३५ अप भागलपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस,गाडी क्रमांक १२३३६ डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस – भागलपूर एक्सप्रेस, गाडी क्रमांक १५६४६ अप गुवाहाटी – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस,गाडी क्रमांक १५६४५ डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस – गुवाहाटी एक्सप्रेस,गाडी क्रमांक -१५६४८ अप गुवाहाटी – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस,गाडी क्रमांक १५६४७ डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस – गुवाहाटी एक्सप्रेस,गाडी क्रमांक १२१४२ अप पाटलिपुत्र – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस,गाडी क्रमांक -१२१४१ डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस – पाटलीपुत्र एक्सप्रेस,गाडी क्रमांक १२१६८अप मंडुआडीह – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस,गाडी क्रमांक १२१६७डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस – मांडुआडीह एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश असल्याचे भुसावळ रेल्वे वाणिज्य विभागाने कळविले आहे.



