भुसावळ – चारचाकी वाहनातून गोमातेची कत्तलीसाठी वाहतुक करणाऱ्या अज्ञात चोरांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी शहरातील गोप्रेमींनी प्रांताधिकारी कार्यालयात २८ रोजी निवेदन दिले
निवेदनात नमूद आहे की शहरामध्ये मध्यरात्री चारचाकीने काही कसाई येवून रात्रीच्या वेळेत बसलेल्या गाईंना गुंगीचे इंजेक्शन देतात त्यामुळे गाई अवघ्या काही सेकंदात गुंगतात याचा फायदा घेऊन गाई वाहनात भरून कत्तलीकरिता नेतात असाच प्रकार सध्या भुसावळात मुख्य फळ भाजीपाला विक्री ठिकाणी मध्य रात्री सुरू असलेला एका गोप्रेमी ने बघीतला एक पांढऱ्या रंगाची मोठी कार आली व बसलेल्या एका गोमातेला त्यांनी वाहनात भरले गोमातेला वाचविण्याला गेले असता कसाई याचेकडे धारदार शस्त्र असतात गोसेवकांच्या जीवितास सुद्धा धोका आहे असा संदिग्ध प्रकार सुरू असून अश्या नराधम कसाईचा बंदोबस्त करावा व त्यांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी निवेदनाद्वारे शहरातील प्राणीमित्र गोरक्षकांनी केलेली आहे .याबाबत निवेदन देण्यात आले यावेळी गोरक्षक रोहित महाले , अमित नेमाणी , चेतन जैन ,तुषार धोसेले, दिवेश अडायगे ,सुजय महाले व समस्त बांधव व गोप्रेमी उपस्थित होते .



