भुसावळ –
भुसावळ शहरातील श्री रामचंद्र महाराज संस्थान ट्रस्ट , राम मंदिर वार्डातील लक्ष्मी चौकात स्थित असलेलं दीडशे वर्ष ब्रिटिश कालीनपूर्व सार्वजनिक प्राचीन श्रीराम मंदिराच्या घुमट निर्मिती आणि कलश स्थापनेचा दिनांक 22जानेवारी2024 या शुभमुहूर्तावर स्थापना होणार आहे. अयोध्या येथील श्रीराम मंदिरात दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी या वैश्विक मुहूर्तावर श्रीराम प्रभूंचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असुन त्याच तिथीस शुभमुहूर्तावर भुसावळ शहरात सुद्धा१५०वर्षानंतर हा कलश स्थापना करुन आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या मंदिराच्या घुमट निर्मितीसाठी आणि कलश स्थापना ही लोक सहभागातून करण्यात येणार असून. या निर्माण कार्यास भुसावळ वासियांनी रामभक्तांनी जास्तीत जास्त संख्येने त्वरित सहकार्य करण्याचे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सरिता श्रीराम चौक तसेच संस्थाचालक राधेश्याम लाहोटी
यांनी आवाहन केले असून सदर कार्य निर्माण साठी श्रीराम मंदीर कळस निर्माण समिति गठीत करण्यात आलेली असुन समिती सदस्य यासाठी परिश्रम घेत आहेत. यासंदर्भात अधिक माहितीसाठी 9823060489 या क्रमांकावर भक्तांनी संपर्क साधण्याचे सुद्धा मंदीर ट्रस्ट तर्फे करण्यात आलेले आहे.
भुसावळ शहरातील राम मंदिर वार्ड ,लक्ष्मी चौक येथील येथील सर्वात प्राचीन श्रीराम मंदिर हे ब्रिटिशपूर्वकालीन असल्याच सांगितल जात, मात्र १८८७ ची नोंद असल्याचं ब्रिटिश कालीन प्रमाणपत्र पुरावा मंदिर ट्रस्ट कडे उपलब्ध आहे.गोदु ताई गणेश जोशी यांच्याकडे या मंदिराची मालकी होती. 1972 मध्ये त्यांचा मृत्यू झाला . तत्पूर्वी 1960 मध्ये त्यांनी मृत्युपत्र तयार करून मंदिराचा ताबा श्रीवल्लभ महादेव यांच्याकडे दिला त्यानंतर त्यांचे वारस पत्र श्रीराम वल्लभ चौक यांनी मंदिराची संपूर्ण देखभाल केली मंदिरातील पूजा अर्चना देखभाल पासून तर प्रसाद वाटपापर्यंत सर्व काम ते स्वतः करीत होते.
या मंदिरात करवीर पिठाचेआद्य शंकराचार्य यांनी साधारणता तीस वर्षांपूर्वी भेट दिली तर साखरखेडा तालुका अकोला येथील प्रल्हाद महाराजांसह अनेक साधू संत,कीर्तनकारांनी मंदिरात भेट देऊन दर्शन घेतले आहे. सर्वात महत्त्वाचे परमपूज्य संत श्रेष्ठ गजानन महाराज शेगाव यांचे पदस्पर्शाने हे मंदिर पावन झालेल आहे.या मंदिरात अनेक सत्संग झालेले आहे. अनिरुद्ध बापूंची उपासना ,कला देवीं बाल उपासना भजन ,भागवत सप्ताह , सत्संग, कीर्तन यासह विविध आध्यात्मिक कार्यक्रम या ठिकाणी वर्षभरात सतत चालू असतात.या मंदिराची देखभाल करत असलेले मंदिराची व्यवस्थापक श्रीराम श्रीवल्लभ चौक यांचे 2020 मध्ये निधन झाले त्यांच्या निधनानंतर या मंदिराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या पत्नी या ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती सरिता श्रीराम चौक या पार पाडत आहे. आज देखील मंदिरात काकड आरती ,भजन ,कीर्तन ,राम जन्मोत्सव नियमितपणे कार्यक्रम साजरे होत असतात.



